in

Yulu E-Bike ची राईड घ्यायचीय ? जाणून घेऊयात प्रकल्प

Share

प्रतीक्षा बनसोडे : वांद्रे-कुर्ला संकुलात आता युलु ई-बाईक ही एक बाईक शेअरिंग सुविधा सुरु झाली आहे. ही सेवा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि युलु बाईक यांनी एकत्रित येऊन सुरु केली आहे. यासाठी बुकिंग कशी करायची आहे ? भाडे किती असणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपल्याला देणार आहोत.

जानेवारी मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते. मात्र लॉकडाउन मुळे ही अमंलबजावणी पुढे ढकलण्यात आली होती.मात्र आता ही सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे बीकेसी हा मोठा विभाग या बाईकने कव्हर करता येणार आहे.

असे बुक करा

  • युलु बाईक साठीचे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर वरुन इंस्टॉल करावे लागेल. या अ‍ॅप वरूनच ई-बाईक बुक करता येणार आहे.
  • अ‍ॅप मध्ये तुम्हाला जवळच्या युलु बाईक स्थानकाची माहिती दिली जाईल.
  • बुकिंग नंतर या स्थानकातून बाईक घ्यायची आहे तसेच वापरानंतर बाईक जमा केल्यावर अ‍ॅपमधून भाडय़ाची रक्कम कापली जाईल.
  • सुरुवातीला 199 रुपये सुरक्षा डिपोझिट भरावे लागेल.
  • युलु बाईकचे भाडे हे प्रति मिनिटाप्रमाणे आकारले जाणार आहे. युलु स्थानकावरून ई-बाईक घेताना पाच रुपये आकारुन बाईक अनलॉक करण्यास सांगितले जाईल तसेच बाईक घेतल्यावर प्रति मिनिट दीड रुपये असे भाडे आकारण्यात येणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

सात हजाराच्या आत स्मार्टफोन असलेल्या Redmi 9A चा आज पहिला सेल !

पोकळ धमक्या देत नाही, अ‍ॅक्शन घेतो