in

ऐश्वर्या कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे कळताच विवेक ओबेरॉयचे ट्वीट…

Share

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन व अभिनेता अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर लगेचच ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या देखील पॉझिटीव्ह झाल्याची माहिती समोर आली होती. या वृत्तानंतर बॉलिवूड कलाकारांसह चाहत्यांनी बच्चन कुटूंब बरे व्हावे असे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये एका ट्विटने साऱ्यांच्याच भुवय्या उंचावल्या…ते ट्विट होते विवेक ओबेरॉयचे…

अभिनेता विवेक ओबेरॉयने, ऐश्वर्या आणि आराध्याला करोना झाल्याची बातमी शेअर करत बच्चन कुटुंबीय लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली.दरम्यान त्यापूर्वी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे कळताच त्याने ट्विट करत काळजी घेण्यास सांगितले होते.

एकेकाळी बॉलिवुडची आघाडीची जोडी म्हणून ऐश्वर्या आणि सलमान यांचं नाव घेतलं जायचं. पण त्यांच्यातील वाद माध्यमांमध्ये आल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं.त्यानंतर ऐश्वर्याचं नाव विवेक ओबेरॉयशी जोडलं गेलं. त्यांनी तेव्हा एकत्र केलेल्या सिनेमामुळे ही चर्चा अधिक गहिरी झाली.मात्र विवेक ओबेरॉय बरोबरच्या कथित प्रेमप्रकरणाबद्दल तिने कधीही वाच्यता केली नाही.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Watch Interview Sharad pawar; एक शरद, सगळे गारद | पाहा मुलाखतीचा अंतिम भाग

CBSE बारावीचा निकाल जाहीर, या संकेतस्थळावर पाहा निकाल