in ,

विरुष्काच्या बाळाची पहिली झलक…

Share

लोकशाही न्यूज नेटवर्क

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न प्राप्त झाले. विराट कोहलीने सोमवारी ट्विटवरून ही गोड बातमी दिली होती. त्यानंतर आता सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. विराट कोहलीच्या भावाने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत लहान बाळाचे पाय दिसत आहेत. ‘Happiness overboard… Angel in th house’अशी कॅप्शन या फोटोसोबत लिहली आहे. मात्र, हा फोटो नक्की विरुष्काच्याच बाळाचा आहे का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
मुलीला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवणार
काही दिवसांपूर्वी व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का शर्मा हिने आपल्या मुलीला काही दिवस प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवणार असल्याचे सांगितले होते. विराट आणि मी खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही बाळाला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे अवघड असले तरी आम्ही या निर्णयाचे पालन करण्याचा प्रयत्न करु, असे अनुष्काने म्हटले होते, आणि विराटने सुद्धा बाळाच्या जन्मानंतर “आमच्या आयुष्याच्या या नव्या इनिंगला तुमच्या सदिच्छांसह सुरुवात करत आहोत. आशा करतो की, यावेळी तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर कराल’अशा शब्दात विराटने टि्वट केले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

शिवसेना उपनेते सुर्यकांत महाडिक यांचे निधन

उस्मानाबादच्या वसंतदादा सहकारी बँकेचे लायसन्स रद्द