in , , ,

‘हाय-व्होल्टेज’ सामन्यापूर्वी विराटने मांडले मत

आज टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा हे संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये 2021 टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या क्रमवारीतील दोन सर्वात महत्वाचे फलंदाज आहेत. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कप्तान विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया मांडली. यापूर्वी पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने ”आम्ही जिंकू” असे म्हटले होते. यावर सामन्याबाबत सडेतोडउत्तर देऊन विराटने आपले मत दिले.

विराट कोहलीच्या मते, पाकिस्तान संघात असे अनेक खेळाडू आहेत जे सामन्याला कलाटणी देऊ शकतात. त्यामुळे त्याला आणि टीम इंडियाला जबरदस्त खेळून दाखवावा लागेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा हाय व्होल्टेज सामना आज संध्याकाळी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमधये सुरू होईल.

विराट म्हणाला, ”पाकिस्तानचा संघ मजबूत आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी त्यांच्याविरुद्ध सर्वोत्तम खेळ खेळावा लागेल. त्याच्या संघात असे काही खेळाडू आहेत, जे सामन्याचा कलाटणी देऊ शकतात. आम्ही पाकिस्तानविरुद्ध आमचा चांगल्या दर्जाचा खेळ नक्कीच दाखवू.” विराटने पाकिस्तान संघ आणि त्यांच्या काही खेळाडूंना मजबूत मानले आहे. त्यामुळे या सामन्यासाठी टीम इंडिया आणखी ताकदीने मैदानात उतरणार आहे.

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने सामन्यासाठी १२ खेळाडूंची घोषणा केली आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यापूर्वी संघाची घोषणा करण्यास असहमती दर्शवली आहे. या संदर्भात तो म्हणाला की, ‘मी सध्या माझ्या प्लेइंग इलेव्हनबद्दल खुलासा करणार नाही. पण आमचा संघ खूप संतुलित आहे.”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भीषण अपघातात ट्रक जळून खाक

इम्रान हाश्‍मीचा नवीन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज