in

धक्कादायक खुलासा! विराटचं संतुलन ढासळतंय

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आगामी वर्ल्डकपनंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली. विराट कोहली याने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विराट कोहली याचे संघातील खेळाडू, प्रशिक्षक, निवड समितीसोबत पहिल्यासारखे संबंध राहिले नव्हते असे बोलले जात आहे. त्यामुळे बीसीसीआयने कर्णधारपदावरून हटवण्यापूर्वीच या 32 वर्षीय खेळाडूने आपणहून टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले.

विराट कोहली याने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ‘द टेलीग्राफ इंडिया’ने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. साऊथहॅम्प्टनमध्ये याच वर्षी झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानचा सामना न्यूझीलंडशी झाला होता. यात हिंदुस्थानचा पराभव झाला. हा सामना संपल्यानंतर संघातील एका वरिष्ठ खेळाडूने बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याकडे कोहलीबाबत तक्रार केली होती. कोहलीच्या वर्तनामुळे सुधारणा होत नसून संघातील खेळाडूंसोबत त्याचे संबंध बिघडत चालले आहेत, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आणि मुली झाल्या सक्षम….

चक्क बैलगाडीत मृतदेह टाकून केली नदी पार; नरसापूर ग्रामस्थांचे हाल