in

महिला दिनानिम्मित विराट कोहलीने शेअर केला खास फोटो

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने आपली मुलगी वामिका आणि पत्नी अनुष्काचा फोटो शेअर केला. हा फोटो शेयर करत विराटने त्यांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपली मुलगीही अनुष्कासारखी व्हावी अशी इच्छा विराटने यावेळी व्यक्त केली.

या पोस्टमध्ये विराटने फोटोला ‘मूलाला जन्म देताना पाहणे सोपे नाही. हा प्रत्येकासाठी एक अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक अनुभव असू शकतो. जेव्हा आपण हे पाहता तेव्हा आपल्याला महिलांचे खरे सामर्थ्य आणि देवत्व समजते आणि देवाने त्यांच्यामध्ये जीवन का निर्माण केले हे समजते. कारण ते आपल्यापेक्षा अधिक मजबूत आहेत. ‘ असे कॅप्शन दिले आहे.

विराट कोहलीने पुढे लिहिले की, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत आणि कोमल मनाच्या महिलेला महिला दिनाच्या शुभेच्छा. तसेच तिलाही शुभेच्छा जी तिच्या आईसारखी होणार आहे. तसेच जगातील सर्व विस्मयकारक महिलांनाही महिला दिनाच्या शुभेच्छा. 11 जानेवारीला विराट कोहली आणि अनुष्का शर्माला कन्यारत्न झाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

JEE Main परीक्षेचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार, येथे पाहा निकाल

रितेश देशमुख आणि जेनेलियाने मानले महाराष्ट्र सरकारचे आभार