in

लग्नसमारंभ, लोकलगर्दीमुळे कोरोना प्रादुर्भाव वाढला

कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्य सरकारला अहवाल पाठवला आहे. कोरोनाविषयी असलेली भीती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकल रेल्वेमुळे झालेली गर्दी यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढत आहे, असं केंद्र सरकारनं अहवालात म्हटलं आहे.

तज्ज्ञांच्या पथकानं राज्याचा दौरा केला होता. यानंतर त्यांनी अहवाल सादर केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपुण विनायक यांच्यासह ३ जणांच्या तज्ज्ञ पथकानं १ व २ मार्च रोजी महाराष्ट्राचा दौरा करून कोरोना स्थितीची पाहणी केली. यानंतर समितीनं राज्य सरकारला आपला अहवाल सादर केला.

अहवाल काय सांगतो?
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. यामुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्य सरकारनं चाचण्यांची संख्या वाढवावी, रुग्णांचा वेगानं शोध घेणं, नियमांची अंमलबजावणी करणं यापुढे सुरू ठेवावी असं अहवालात म्हटलं आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर लक्ष देणं गरजेचं आहे, असंही अहवालात म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गोवा, मुंबईतील काही ठिकाणी ‘एनसीबी’ची छापेमारी

दिल्ली बाटला हाऊस चकमक, आरीझ खान दोषी