राज्यावरील कोरोनाचे संकट गहिरे होत असताना, राज्यातील एका मंत्र्याने शक्तीप्रदर्शन करताना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोरोना संबंधीचे आदेश धाब्यावर बसवले. त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (21 फेब्रुवारी) फेसबुक लाइव्ह करून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सोमवारपासून (22 फेब्रुवारी) सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर काही दिवसांसाठी बंदी असल्याचे जाहीर केले होते. तसेच मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा या तीन गोष्टींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.
मात्र, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज (23 फेब्रुवारी) वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे दर्शनासाठी गेले होते. पुण्यामध्ये पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने आत्महत्या केली होती. या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. अज्ञातवासात असलेले संजय राठोड तब्बल 15 दिवसांनंतर जनतेसमोर आले. पण त्यांनी तिथे हजारो राठोड समर्थकांनी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता तसेच अनेक जण विनामास्क होते.
कारवाई होणार का?
पुण्याच्या हडपसर येथे माजी खासदार आणि भाजपा नेते धनंजय महाडिक यांच्या मुलाचा रविवारी विवाह झाला. या विवाह सोहळ्यासाठी हजार ते बाराशे लोकांची गर्दी जमविल्याबद्दल धनंजय महाडिक यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता वनमंत्री संजय राठोड यांच्यावरही अशीच कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Loading…