in

सही घेण्यासाठी ‘ते’ मातोश्रीवर… राणे आणि राऊत आमने-सामने

लोकशाही न्यूज नेटवर्क

गृहमंत्री अमित शाह यांची पाठ फिरल्यानंतर सिंधुदुर्गमध्ये भाजपाच्या सात नगरसेवकांनी राजीनामा दिला. यानंतर सर्व नगरसेवकांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे शिवसेना आणि राणे गटात वादाला तोंड फुटलंय. खासदार विनायक राऊत यांनी पलटवार केल्यावर निलेश राणेंनी देखील यात उडी घेतली. अमित शाह सिंधुदुर्गात आले त्याच वेळी आम्ही भाजपाला झटका देऊ शकत होतो. पण राणेंची थोडी तरी राखावी, म्हणून आम्ही या सात नगरसेवकांचा प्रवेश पुढे ढकलला, असे विनायक राऊत यांनी म्हटले.

सध्या नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद देण्याची चर्चा सुरू आहे. त्यावरून राऊत यांनी नारायण राणेंना नॉन मॅट्रिक म्हणून हिणवले. त्यांना मंत्रीपद देण्याची वेळ आली, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. कॉलेजच्या उद्घाटनासाठी मंजुरीच्या फाईलवर सही करण्यासाठी राणे यांनी मातोश्रीवर फोन केल्याचे राऊत म्हणाले. यानंतर हे प्रकरण आणखी चिघळलं.

या सगळ्यावर नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे व्यक्त झाले. शिवसेनेने केलेल्या नुकसानीच्या पाच पटीने नगरसेवक फोडू, असा इशाराच निलेश राणेंनी दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धुळे : जयंत पाटलांच्या सभेत कार्यकर्त्यांचा ‘राडा’

नागपूर खंडपीठाच्या बलात्कार प्रकरणावरील ‘त्या’ निर्णयावर ‘सर्वोच्च’ सुनावणी