in

सांगा आता कस जगायचं ?

निसार शेख
2005 ला कोकणात अतिवृष्टीमुळे चिपळूण गोवळकोट येथील बॊधवाडीतील 15 घरांवर दरड कोसळली त्यानंतर त्यांना तेथून स्थलांतर करण्यासाठी प्रशासन यांनी नोटीस बजावली त्याही परिस्थिती जीव मुठीत घेऊन 15 कुटुंब राहत होते मात्र दरडीचा धोका अधिक असल्यामुळे त्याचं जिल्हा परिषदच्या मराठी शाळेत स्थलांतर करण्यात आले त्यानंतर आपलं पुनर्वसन गोवळकोट धक्काच्या शासकीय जागेत व्हावे अशी मागणी पुर्नवसन समितीनी केली असली तरी गेली सहा वर्ष जागेच्या प्रश्नावरून अद्याप त्यांचे पुनर्वसन झाले नाही ज्या जिल्हा परिषद शाळेत गेली सहा वर्ष कदम कुटुंबानी संसार थाटला आहे त्याही इमारतीची अवस्था बिकट झाली आहे त्यामुळे नऊ कुटुंब आपल्या लहान सहान लेकरांबरोबर जीव मुठीत घेऊन दिवस काढत आहेत.

15 कुटुंबाचे स्थलांतर जिल्हा परिषद मराठी शाळेत केले असले तरी पुर्नवसन समितीने आपला लढा कायम सुरू ठेवला शासन दरबारी वारंवार पत्रव्यवहार करून पुर्नवसनसाठी आवाज उठविला त्यानंतर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने कापसाळ येथील जागेत त्यांचे पुर्नवसनसाठी पाऊले उचलली मात्र पुर्नवसन समितीने गोवळकोट धक्का येथील सरकारी जागेतच पुर्नवसनची मागणीला जोर धरला त्यानुसार घरांचे फ्लॉटिंग करून भूमिपूजन सुद्धा करण्यात आले मात्र मध्येच माजी खासदार हुसेन दलवाई यांनी विषयाला खो घातला आणि शासनाला चुकीची माहिती सादर केली गोवळकोटच्या खाडी भाग पूररेषा असल्यामुळे त्याठिकाणी पुर्नवसन करणे चुकीचे आहे अशी माहिती सादर करण्यात आली त्यानुसार प्रशासन यांनी काम थांबविले त्यावरून पुर्नवसन समिती व दलवाई असा वाद सुरू झाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिन विशेष | …आणि शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले!

पोषण टँकर एप्सच्या विरोधात आयटक सह अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आंदोलन