in

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे गाव गेल्या 40 वर्षां बनले हत्ती रोगाचे केंद्र

कमलाकर बिरादार , नांदेड
नांदेडच्या कंधार तालुक्यातील पेठवडज गावालगत वाहत आसलेल्या नाल्याच्या घाण पाण्यात डासांचे साम्राज्य झाले असून गेल्या 40 वर्षांपासून हे गाव हत्तीरोगाचे केंद्रबिंदु बनले आहे.

वरवर पत्रव्यवहार ,निवेदने देऊनही हा प्रश्न मार्गी लागत नासल्यामुळे त्रस्त गावकर्यांना आता आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागतोय.


‘जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी पेठवडज गावाची दशा पहावी अन्यथा 30/11/2021 रोजी गावकऱ्यांनी गावालगत असलेल्या त्याच नाल्यात सामूहिकरित्या घाण पाण्यात उतरून जिल्हा प्रशासनाचा व पालक मंत्र्यांचा निषेध करत आंदोलन करू’ असा इशारा गावचे सरपंच , उपसरपंच आणि ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे दिलाय. जो पर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत घाण पाण्यात उतरून अनोखा आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिलीय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईमध्ये कोरोना संख्येत पुन्हा वाढ

येत्या पाच दिवसात महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात अतिमुसळधार पाऊस