उत्तर प्रदेश पोलीस हत्याकांडातील आरोपी विकास दुबेचे एन्काऊंटर झाल्याची बातमी समोर आली आहे. कानपुरमध्ये त्याला नेले जात असताना गाडी उलटल्यानंतर विकासने पोलिसांची बंदूक घेऊन पळ काढला होता. या दरम्यान झालेल्या चकमकीत विकास दुबेच मृत्यू झाला आहे. अतिशय नाट्यमयरीत्या घडलेली हि घडामोड होती. एखाद्या सिनेमाला साजेशी हि घडामोड असल्याचे याला बोलले जात आहे.
मध्य प्रदेशातील उज्जैन येथे विकास दुबेला अटक केल्यानंतर त्याला उत्तर प्रदेशातील कानपूर येथे नेलं जात होतं.दरम्यान रस्त्यातच पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला होता. या अपघातात विकास दुबे पोलिसांच्या बंदूक घेऊन पळाला होता. यानंतर काही वेळ विकास दुबे आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकी दरम्यान विकास दुबेला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. एखाद्या सिनेमातील उत्कठा वाढवणारी रंजक कथा जशी असते तशी हि घटना घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या घटनेमागे काही गौडबंगाल तर नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.
Comments
0 comments