in

Vijay hazare Trophy; मुंबई संघाची घोषणा, श्रेयस अय्यर कर्णधार

लोकशाही न्यूज नेटवर्क | विजय हजारे करंडकासाठी मुंबई संघाची घोषणा झाली आहे. धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरकडे मुंबई संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. येत्या 20 फेब्रुवारीपासून विजय हजारे करंडकाला सुरुवात होत आहे.

भारताचे माजी ऑफ स्पिनर रमेश पोवार यांची टूर्नामेंटच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. मुंबईला एलीट ग्रुपमध्ये दिल्ली, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पाँडेचरी या संघांसोबत ठेवलं आहे. जय हजारे ट्रॉफीला येत्या 20 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल.ही टूर्नामेंट कोलकाता, सूरत, तमिळनाडू, जयपुर, बँगलोर आणि इंदौर या सहा ठिकाणी खेळवण्यात येईल.

मुंबई टीम : श्रेयस अय्यर (कप्तान), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, यशस्वी जायसवाल, अखिल हेरवाडकर, सरफराज खान, चिन्मय शंकर, आदित्य तारे, हार्दिक तामोर, शिवम दूबे, आकाश पारकर, आतिफ अटवाल, आतिफ अटवाल अंकोलेकर, साईराज पाटील, सुजित नायक, तनुश कोटियन, प्रशांत सोळंकी, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, सिद्धार्थ राउत आणि मोहित अवस्थी

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कैद्यांना दिलासा; वकील, कुटुंबियांना भेटता येणार

पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत