मराठी सिनेसृष्टीमधून एक दुःखद बातमी येत असून ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा वृद्धापकाळाने वयाच्या 91 व्या वर्षी निधन झालं आहे…अनेक दिवस ते वृद्धापकाळाने आजारी होते आणि घरीच होते त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झालं आहे…
मधुचंद्र, सिंहासन, गंमत जंमत, वासुदेव बळवंत फडके, उंबरठा हे त्यांचे काही गाजलेले मराठी सिनेमे तर मराठी रंगभूमीवर त्यांनी वाऱ्यावरची वरात, तुझं आहे तुजपाशी आणि लेकुरे उदंड झाली अशी एकापेक्षा एक उत्तम नाटकं दिली आहेत.श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनु मोघे हा सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनेता असून त्यांची सून प्रिया मराठे ही सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे…
Comments
Loading…