in

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

Share

मराठी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. मात्र आज पहाटे ४.४५ वाजता सातारा येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत माळवळी. या दु:खद घटनेने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सातारा येथील फलटण तालुक्यात सोनी मराठीवर सुरु असलेल्या ‘माझी आई काळूबाई’ मालिकेच शुटिंग सुरू आहे. या मालिकेच्या शुटिंग दरम्यान आशालता वाबगावकर यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. यावेळी सेटवर कोरोना टेस्ट करण्यात आल्यानंतर काही जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर साऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आशालता वाबगावकर यांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आढळला होता.

दरम्यान 16 सप्टेंबर रोजी त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. या उपचारा दरम्यानच आशालता वाबगावकर यांचे निधन झाले आहे. या घटनेने मराठी चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आहे.

नाटक
आश्चर्य नंबर १० (१९७१), गरुड झेप (१९७३), गुड बाय डॉक्टर (१९७६), गुंतता हृदय हे (१९७४), गोष्ट जन्मांतरीची (१९७८), छिन्न (१९७९), देखणी बायको दुसऱ्याची (१९९२), मत्स्यगंधा (१९६४), रायगडाला जेव्हा जाग येते (१९६२), विदूषक (१९७३)

चित्रपट
आत्मविश्वास (१९८९), तिन्ही सांजा(२००९), पकडापकडी (२०११),मणी मंगळसूत्र (२०१०), लेक लाडकी (२०१०), वन रूम किचन (२०११),

गायलेली नाट्यगीते
अर्थशून्य भासे मज हा कलह प्रीतीचा (मत्स्यगंधा), गर्द सभोतीं रानपाखरे, तू तर चाफेकळी (मत्स्यगंधा), जन्म दिला मज त्यांनी (मत्स्यगंधा), तव भास अंतरा झाला (मत्स्यगंधा), स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या (विदूषक)

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन; अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या नावाचा खुलासा

भिवंडी इमारत दुर्घटना; मृत्यू संख्या पोहचली 20 वर