in

भाज्यांचे भाव गगनाला भिडले, नॉनव्हेजपेक्षा व्हेज महाग

सणांच्या दिवसातही सामान्य जनतेला दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसत आहेत. तेल, गॅस ,डाळी, पेट्रोल ,डिझेल सह आता भाज्यांचे दर देखील वाढले आहे. यंदा अवकाळी पाऊस झाल्यामुळे भाज्यांची आवक कमी झल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाचे हाल होत आहे आता महागाई झाल्यामुळे सामान्य माणसाने खावे काय हा मोठा प्रश्न उभारला आहे. कांदे 55 तर टोमॅटो मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांसह टोमॅटो बेंगळुरू, हिरवी मिरची बुलडाणा व मौदा आणि कोथिंबीर नाशिक, नांदेड, उमरानाला येथून विक्रीला येत आहे. सिमला मिरचीची आवक भिलाई, रायपूर येथून आहे. फूलकोबीचे भाव ६० रुपये आहेत. पालक ७० ते ८० आणि मेथीचे भाव १२० रुपयांवर पोहोचले आहेत. ८० रुपये किलोचे वांगे सध्या ५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. प्रत्येक भाज्यांमागे 30 ते 40 रुपये प्रतिकिलो भाव वाढला आहे. वाशी येथील एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात आवक कमी झाल्याने दर कडाडले आहेत.

घाऊक बाजारात वाढ झाल्याने या सर्व भाज्या किरकोळीत दुप्पट ते तिप्पट दराने विकल्या जात आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ झाल्याने ही दरवाढ करण्याशिवाय पयार्य नसल्याचे भाजी विक्रेते म्हणत आहेत. राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर सध्या नागपुरात विकली जातेय. सध्या नागपूरातील किरकोळ बाजारात कोथिंबीरचा दर 320 ते 360 रुपये किलोंवर पोहोचला आहे. शिवाय आवक कमी झाल्यामुळे घाऊक बाजारात किमतीत वाढ झाल्याने भाज्या दुपटीने विकल्या जात आहे. पेट्रोल डिझेल च्या किमतीत देखील वाढ झाल्याने भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. सिमला मिरचीचे दर आता 80 रुपये झाले आहे पूर्वी सिमला 40 रुपये किलोच्या दराने मिळत होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबरनाथ स्थानकावर रेल्वे पोलिसाने वाचवले तरुणाचे प्राण

…तिसऱ्या लाटेचा धोका नाही, 70 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण : राजेश टोपे