in

वसईच्या क्राइम ब्राँच युनिट दोनच्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क | संदीप गायकवाड

वसईच्या क्राइम ब्राँच युनिट दोनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी एका आरोपीला कल्याणमधून पकडून गाडीतून आणत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात आरोपीला पळवून नेण्यात हल्लेखोरांना यश आले तर, तीन पोलिसांना दुखापत झाली असून एका कर्मचाऱ्याचे डोके फुटले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा शहरात पोलीस असल्याची बतावणी करून लोकांना फसविणाऱ्या इराणी आरोपीबाबत खात्रीशीर माहिती वसईच्या क्राइम ब्राँच युनिट दोनचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर यांना मिळाली होती. सदर आरोपींवर तीन ते चार गुन्हे दाखल असून त्याला पकडण्यासाठी क्राइम ब्राँच युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर, अमोल कोरे, मंगेश चव्हाण, रमेश भोसले, प्रशांत पाटील, शरद पाटील आणि अमोल तटकरे यांची टीम गुरुवारी कल्याणला गेली होती.

सदर टीम आरोपीला पकडून गाडीतून आणत असताना आंबिवली येथील रेल्वे फाटकाजवळ शेकडोच्या वर जमावाने तुफान दगडफेक करून प्राणघातक हल्ला चढवला. यात पोलीस कर्मचारी अमोल कोरे याच्या डोक्यात दगड लागल्याने डोके फुटले असून तीन टाके पडले आहे. तर पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील आणि अधिकारी गुर्जर यांना मुका मार लागला असून ते किरकोळ जखमी आहेत. तसेचं दगडफेकीत गाडीच्या काचा फोडून नुकसान झाले आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस अधिकारी संतोष गुर्जर यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘केंद्र सरकारनंच सेलिब्रेटी लोकांना टि्वट करायला सांगितलं’

“ड्रग्ज अॅडिक्टला झाशीची राणी बोलताना लाज वाटली नाही का?”