in ,

लस उपलब्ध करावी – सोनू सूद

लसीकरण सुरु झालं असलं तरी अद्याप केवळ 45 वर्षांवरील लोकांना लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने करोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता 25 वर्षांवरील जनतेसाठी देखील लस उपलब्ध करून द्यावी अशी सरकारकडे मागणी केली आहे. सोनू सूदने एक ट्विट करत सरकारला अपील केलं आहे.

” मी विनंती करतो की 25 वर्ष आणि त्यावरील जनतेसाठी लसीकरण सुरू करण्यात यावं. रुग्ण संख्या वाढतेय त्यात लहान मुलांनादेखील करोनाची लागण होतेय. त्यामुळे 25 वर्षांवरील जनतेसाठी देखील लसीकरणाची घोषणा करण्याची वेळ आली आहे. तरुणांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसून येतेय. अस ट्विट द्वारे त्याने सरकारकडे विनंती केली आहे.

सोनूने अमृतसर इथं एका रुग्णालयात नुकतीच करोनाची लस घेतली आहे. यावेळी त्यांने सोशल मीडियावरून माहिती दिली होती. “मी करोनाची लस घेतली आहे. आता माझ्या देशाने करोनाची लस घ्यावी. आज पासून आम्ही संजीवनी नावाचं नवं लसीकरण अभियान सुरू केलं आहे. हे अभियान लोकांमध्ये जनजागृती करेल आणि लसीकरणासाठी प्रोत्साहन देईल.” अस सोनु सुदने सांगितला आहे. देशावर करोनाचं संकट ओढावल्यापासून सोनू सूदने अनेक गरजूंना मदत करण्याचं काम हाती घेतलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाबाधित रुग्णाचा उपचार थांबवला; खासगी रुग्णालयांची मनमानी

आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात; मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुत आज सामना