in

आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्ध्याची लसीकरण नोंदणी थांबवली

A health official draws a dose of the AstraZeneca's COVID-19 vaccine manufactured by the Serum Institute of India, at Infectious Diseases Hospital in Colombo, Sri Lanka January 29, 2021. REUTERS/Dinuka Liyanawatte/File Photo

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्राने पहिल्या फळीतील करोना योद्धे असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरण नाव नोंदणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तसे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सचिवांना या संदर्भात पत्र पाठवले आहे. आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोविड योद्ध्यांची लसीकरण नोंदणीला तात्काळ थांबवावी, असे आदेश केंद्रीय सचिवांनी दिले आहेत. काही अपात्र लाभार्थी नियमांचा भंग करून या श्रेणीतून नोंदणी करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत, असं केंद्राने म्हटलं आहे.

देशात करोना लसीकरणाची सुरूवात आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोविड योद्ध्यांपासूनच झाली होती. मात्र मागील काही दिवसांत या श्रेणीतून नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोंदणीमध्ये अचानक झालेल्या वाढीनंतर केंद्रानं हा निर्णय घेतला आहे. “४५ वर्षांपुढील नागरिकांना को-विन प्रणालीवरून नोंदणी केली जाणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ज्या आरोग्य सेवा कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोविड योद्ध्यांच्या नावाची लसीकरणासाठी नोंदणी झालेली आहे. त्यांना लवकरात लवकर लस देण्यात यावी,” असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रात म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा

‘…आनंद महिंद्रा मोदींच्या लॉकडाउनमध्ये टाळ्या, थाळ्या वाजवत होते’