in

लसीचा झाला त्रास…नुकसान भरपाई म्हणून केली कोर्टात पाच कोटींची मागणी

कोरोनाची लस घेतल्यानंतर अनेक जणांवर त्याचा उलट असर पहायला मिळाला. त्यामुळे अशाच एका लस घेतलेल्या व्यक्तीने न्यायालयाचे दार ठोठावून नुकसान भरपाई म्हणून पाच कोटींची मागणी केली आहे. याचिकाकर्त्याच्या या मागणीनंतर मद्रास उच्च न्यायालयाने ‘सीरम’, आयसीएमआरला नोटीस बजावली आहे.

कोविशील्ड लस घेतल्यानंतर एका व्यक्तीला शारीरिक त्रास जाणवू लागला. या व्यक्तीने गेल्या वर्षी 1 ऑक्टोबरला कोरोनाची लस घेतली होती. 10 दिवसानंतर त्यांना डोकेदुखी आणि इतर त्रास झाला. यावेळी उपचारासाठी 16 दिवस रुग्णालयातही रहावे लागले होते. त्यामुळे या व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत त्याने नुकसान भरपाई म्हणून पाच कोटींची मागणी केली आहे.

या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश अब्दुल कुटोस यांच्यासमोर पार पडली. यावेळी न्यायालयाने कोरोना रोखण्यासाठी देण्यात आलेली ही लस सुरक्षित आहे की नाही, हे स्पष्ट करावे, अशी विचारणा नोटीसीद्वारे न्यायालयाने सीआयआय आणि आयसीएमआर यांना शुक्रवारी केली. तसेच सुनावणी तहकूब करत औषध नियामकांसह केंद्रीय आरोग्य विभागाला या याचिकेवर 26 मार्चपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्ध्यात संचारबंदी लागू, वैद्यकीय सेवा वगळता सर्व

तुम्ही मोदी सरकारच्या दबावाखाली आहात का? नाना पटोलेंचा बिग बी आणि अक्षयला सवाल