in

लसीकरण पूर्ण करणा-या ग्रामपंचायतींना मिळणार ५ लाखांचा निधी

वर्धा जिल्ह्यात लससाठा उपलब्ध असला तरी ग्रामीण भागात लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळं गावांतील लसीकरण पूर्ण व्हावं, याकरीता आमदार रणजित कांबळे यांनी पुढाकार घेतलाय. लसीकरण लवकर पूर्ण करणा-या ग्रामपंचायतींना पाच लाख रुयांचा निधी आमदार निधीतून दिला जाईलं, असं आमदार रणजित कांबळे सांगितलंय. ग्रामीण भागात लसीकरण वाढवण्याची गरज निर्माण झालीये. तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेऊन लसीकरण वेगानं करण्यासाठी देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींना पाच लाख रुपयांची कामं प्रस्तावीत केली जाईलं, असं आमदार रणजित कांबळे यांनी ऑनलाईन बैठकीत सांगितलं. आमदार कांबळे यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार ,तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंचांची आदी उपस्थित होते. यावेळी लसीकरण वाढण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश आमदार कांबळे यांनी दिलेत.

गावात ९० टक्के लसीकरण पूर्ण करणा- या ग्रामपंचायतींनाही आमदार निधीतून पाच लाख रुपयांचा विशेष निधी देण्यात येईल, असे सांगत, आमदार कांबळे यांनी कोरोनाच्या तिस-या लाटेपासून बचावाकरीता लसीकरणाची गरज व्यक्त केली. सध्या ४५ वर्षांवरील लसीकरण संथगतीने सुरू आहे. लवकरच १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू होईल. तेव्हा केंद्रावर गर्दी राहील. त्यामुळे ४५ वर्षांवरील सर्वांनी तातडीने लसीकरण करावे, असे आमदार कांबळे यांनी सांगितले. सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींचे सहकार्य घेत लसीकरणासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलिस पाटील,शिक्षक यांचाही जनजागृतीकरिता सहभाग घ्यावा. असे आवाहन आमदार रणजित कांबळे यांनी यावेळी केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मालाड दुर्घटनाः राज्य सरकारची मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

अमरावतीत मुसळधार पावसामुळे शेकडो क्विंटल शेतमाल पाण्यात