in

vaccination | देशात लसीकरण पूर्ण होईपर्यत, परदेशात पाठवू नका – अजित पवार

देशात कोरोना रुग्णाचा उद्रेक होता असतानाच लसीच्या वाटपाच्या आकडेवारीमुळे वाटप करताना केंद्राकडून दुजाभाव होत असल्याचे मत महाराष्ट्र शासनाचे आहे . काल वाटप केलेल्या साडेतीन कोटी लसीमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त साडेसात लाख लसी आल्या आहेत. लसीचा तुटवडा असेल तर महाराष्ट्रातील आणि आपल्या देशातील लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय परदेशात लस पाठवू नका अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

‘लस वाटपाचे केंद्राचे धोरण विचित्रच आहे महाराष्ट्राची लोकसंख्या साडेबारा कोटी, लसीचा पुरवठा साडेसात लाख, हरियाणाची लोकसंख्या आपल्या निम्मी देखील नाही त्यांना वीस लाख लसीचे डोस दिले आहेत. कोरोना हा लोकांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे यात आम्हाला राजकारण करायचे नाही केंद्राने करू नये पुण्यात आम्ही रोज एक लाख लोकांना लस देण्याचे नियोजन केले आहे लसच पुरेशी नसेल तर कसं काम करणार, एप्रिल अखेर पर्यत 45 वर्षाच्या वरील सर्व लोकांना लस देण्याचे राज्यशासनाचे नियोजन आहे. त्यासाठी केंद्राने मागणी प्रमाणे लस उपलब्ध करुन द्यावी.’, अशी मागणी त्यांनी यावेळी के

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवारांनी केंद्र शासनाच्या लस वाटपावर हे वक्त्याव्य केले. अजित पवारांसोबत राहुल गांधीनी देखील कोरोना लसींची निर्यात लगेच थांबण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Stock market: शेअर मार्केटमध्ये 154 अंकांंची घसरण

Prince Phillip: प्रिन्स फिलीप यांचे ९९ व्या वर्षी निधन… राजघराण्यावर शोककळा