लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतामध्ये गेल्या 28 दिवसांत जवळपास 80 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत लसीकरणाची 1 लाख 64 हजार 781 सत्रे झाली आहेत.

देशभरात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 79 लाख 67 हजार 647 नागरिकांना लस देण्यात आली आहे. यापैकी 59 लाख 9 हजार 136 हे आरोग्य कर्मचारी आणि 2 लाख 5 हजार 511 हे फ्रंटलाइन वर्कर्स आहेत. 12 फेब्रुवारी रोजी 4 लाख 62 हजार 636 इतक्या लाभार्थ्यांना (94 हजार 160 आरोग्य कर्मचारी आणि 3 लाख 68 हजार 477 फ्रंटलाइन वर्कर्स) 10 हजार 411 सत्रांमधून लस देण्यात आली.
भारतातील एकूण लसीकरणापैकी 60 टक्के (59.70 टक्के) संख्या ही 8 राज्यांमधली आहे. या 8 राज्यांमध्ये प्रत्येकी 4 लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. भारतातील एकूण लाभार्थ्यांच्या आकडेवारीपैकी एकट्या उत्तर प्रदेशातील 10.08 टक्के (8 लाख 58 हजार 602) लाभार्थी आहेत.
Comments
Loading…