in

Teach Update: Realme चा V11 5G स्मार्टफोन लाँच

लोकशाही न्यूज नेटवर्क

ओप्पोची उपकंपनी Realmeने 5G स्मार्टफोन बाजारात आणला आहे. Realme ने आज V सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme V11 5G हा कंपनीचा एक परवडणारा 5G स्मार्टफोन आहे. यामध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

डिस्प्ले: या फोनमध्ये 60Hz रिफ्रेश रेटचा 6.52-इंच IPS LCD डिस्प्ले देण्य़ात आला आहे. यामध्ये स्क्रीनच्या वरती वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आली आहे. यामध्ये 5G नेटवर्क सपोर्टसाठी MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज स्पेस वाढविता येणार आहे. 5000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगद्नारे वेगाने चार्ज करता येणार आहे.

कॅमेरा: या फोनमध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच य़ामध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. या फोनमध्ये अँड्रॉईड 11 वर चालणारे Realme UI देण्यात आली आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर साईडला देण्यात आला आहे. सध्य़ा हा फोन चीनमध्ये लाँच झालेला आहे. भारतातही लवकरच हा फोन य़ेणार आहे.

किंमत : Realme V11 5G च्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत RMB 1,199 म्हणजेच 13,500 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत RMB 1,399 म्हणजेच 15,800 रुपये ठेवण्यात आली आहे. व्हायब्रेंट ब्लू आणि क्वाईट ग्रे कलरमध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Farmers Protest: ‘ही’ तीन राज्ये सोडून उद्या देशात होणार चक्का जाम आंदोलन

केंद्रातील १३ खात्यांमध्ये सनदी अधिकाऱ्यांचा ‘समांतर प्रवेश’