in

Uttarakhand | तपोवन धरणात अडकलेल्या 16 जणांना बचावण्यात यश

लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये मोठे नुकसान झाले असून गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. या ठिकाणी काम करणारे जवळपास १०० ते १५० मजूर दुर्घटनेनंतर बेपत्ता झाले होते. यातील, तपोवन धरणात अडकलेल्या १६ जणांना सुखरुप बचावण्यात बचाव पथकाला यश आलंय. घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

नऊ मृतदेह हाती

अद्याप नऊ मृतदेह हाती लागले आहेत तर इतर १०० हून अधिक जण बेपत्ता आहेत. या सर्वांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तपोवन धरणाजवळ पाण्याच्या प्रवाहात अडकून पडलेल्या १६ जणांना वाचवण्यात आल्याचं आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिलीय.

उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांत अलर्ट जारी

पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे प्रशासनाकडून उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या लोकांना नदीपासून लांब राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नारायण राणेंवर अन्याय होणार नाही, अमित शहांची ग्वाही

संबित पात्रा तर नरेंद्र मोदी यांच्याही पुढे…