in

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, 150 जण बेपत्ता, 10 मृतदेह हाती, बचावकार्य सुरु

लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तराखंडमधील जोशी मठाजवळ हिमकडा कोसळल्यानं धरणाचा बांध फुटला आहे. या घटनेनंतर हरिद्वार पर्यंत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमकडा कोसळल्याने धरणाचा बांध फुटला असून अनेक लोक त्यामध्ये वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. 1070 आणि 9557444486 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धावली गंगा नदीला महापूर आला आहे. ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

पोलीस सर्वाना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.नागरिकांनी घाबरून जावू नये.” असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी सांगितले आहे.

उत्तराखंडमधील नद्यांच्या पाणीच्या पातळीत वाढ झाली आहे. एनडीआरएफच्या ५ टीम घटनास्थळी पोहचल्या आहेत. याचबरोबर आईटीबीपी चे जवान सुद्धा घटनास्थळी पोहचले आहेत. त्याचप्रमाणे वायूसेना देखील युद्ध पातळीवर तिथे काम करत आहे. या कठीण प्रसंगी केंद्र सरकार उत्तराखंड सोबत आहे, राज्याला जी मदत लागेल ती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहेत. अशी माहिती केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी सिंधुदुर्ग येथे माध्यमांना दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीवर रोहित पवारांची सरकारवर टीका

छत्रपती उदयनराजे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची भेट