in

उत्तराखंड महाप्रलय: बचावकार्यात 15 जणांना वाचविण्यात आले यश

लोकशाही न्यूज नेटवर्क | उत्तराखंडच्या चमोलीमध्ये रविवारी हिमकडा कोसळून झालेल्या महाप्रलयात 10 जण ठार, तर 170 हून अधिक जण बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. या घटनेत बचाव मोहिमेदरम्यान आतापर्यंत 15 जणांना वाचविण्यात यश आहे. तसेच 14 जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती चमोली पोलिसांनी दिली आहे.

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यामध्ये एक हिमकडा कोसळल्याची घटना घडली. हिमकडा कोसळल्यामुळं पाण्याचा एकच लोट आला, ज्यामध्ये अनेक प्रकल्पांवर काम करणारे मजूरही वाहून गेले, किनाऱ्यालगत असणाऱ्या बहुतांश भागाचंही नुकसान झालं.दुर्घटनेनंतर घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेत बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू करण्यात आला. अजूनही बचावकार्य या ठिकाणी राबविले जात आहे.

चामोलीतील जोशीमठ येथे दुसर्‍या दिवशीही बचावकार्य सुरू झाले आहे. एका बोगद्यातून १२ जणांना वाचविण्यात आले. तसेच गाळाखाली दबलेल्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. लोकांचा बचाव करण्यासाठी जेसीबी मशीनच्या सहाय्याने दुसरा बोगदा साफ केला जात आहे.

आयटीबीपी, इंडियन आर्मी, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ सैन्याने परत आणखी शोधकार्य सुरु केले आहे. आतापर्यत बचाव मोहिमेदरम्यान आतापर्यंत 15 जणांना वाचविण्यात आले असून 14 जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती चमोली पोलिसांनी दिली आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Parliament Session|आज पंतप्रधान राज्यसभेत बोलणार

नागपूरमध्ये नागरिकांनी केली गुंडाची हत्या