in

उर्मिला मातोंडकर यांनी लोकनृत्यावर धरला ठेका

ठाण्यात विहंग चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आयोजित मंगळा गौर कार्यक्रमात उर्मिला मातोंडकर या उपस्थित झाल्या होत्या. यावेळी त्यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी लोकनृत्यावर ठेका धरला.यावेळी शिवसेना नगरसेविका परिषा सरनाईक या देखील उपस्थित होत्या. आदिवासी नृत्यावर ठेका धरल्यानंतर उपस्थितांसाठी त्यांनी यावेळी लावणीच्या दोन ओळी देखील गाऊन सर्वांची मन जिंकली. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना चित्रपट गृह, नाट्यगृह अद्यापही बंद असल्याबाबत विचारले असता एक कलाकार म्हणुन माझ्यासाठी खुप मोठी शोकांतिका आहे मात्र लवकरात लवकर ते देखील सुरु होईल असे मातोंडकर यांनी सांगितले.

कोरोना काळात मराठी कलाकार,लोक कलावंत,नाट्यकर्मी यांचं मोठं नुकसान झालं असुन अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे, एक कलाकार म्हणुन हि खुप मोठी शोकांतिका आहे, मला पण वाटत नाट्यगृह आणि चित्रपटगृह लवकरात लवकर सुरु व्हावे मात्र कोरोना काळात बंद खोलीत एकत्रित येण धोक्याचे असल्याने ते अद्यापही सुरु करण्यासाठी वेळ लागतोय, पण लवकरच ते देखील सुरु करण्याचा निर्णय येणार असल्याचे अभिनेत्री आणि शिवसेना महिला उपनेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

RJ मलिष्काने नीरजकडे मागितली ‘जादू कि झप्पी’, नीरज म्हणाला…

Maharashtra Corona | नव्या बाधितांच्या संख्येत घट; ६ हजार ३८४ रूग्ण कोरोनामुक्त