in

देशाच्या कण्यालाच ‘खलिस्तानी’ संबोधणे गैर, उर्मिला मातोंडकर यांचा कंगनावर निशाणा

लोकशाही न्यूज नेटवर्क

कृषी कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटताच सेलिब्रिटज देखील मैदानात उतरले आहेत. अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या यांनी देखील शेतकरी आंदोलकांचे समर्थन करताना अभिनेत्री कंगना रणौतसह इतर विरोधकांवर निशाणा साधला आहे.

प्रजासत्ताक दिनी राजधानीत झालेल्या हिंसाचारानंतर कंगनाने आपल्या ट्विटर हॅण्डलवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘कथित आंदोलक शेतकऱ्यांकडून प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला आणि तिथे खलिस्तानचा झेंडा फडकावण्यात आला. या सर्व घटनांमुळे आज जगात आपण चेष्टेचा विषय ठरलो आहोत. स्वतःला शेतकरी म्हणवणाऱ्या दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. या सर्वांना तुरुंगात डांबले पाहिजे. त्यांची सर्व प्रकारची संपत्ती जप्त केली पाहिजे, असे तिने या व्हिडीओत म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर उर्मिला यांनी केलेल्या या वक्तव्याला विशेष महत्त्व आले आहे. विलेपार्लेमध्ये आज उर्मिला मातोंडकर यांनी आपला वाढदिवस लहान मुलांसह वयस्कर महिलांसोबत साजरा केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे. तीन कृषी कायद्यांमुळे शेतकरी आनंदी नसतील तर, केंद्र सरकारने याबाबत विचार करण्याची गरज आहे. तसेच या आंदोलनकारी शेतकऱ्यांना खलिस्तानी, देशद्रोही संबोधले गेले. हा त्यांचा अपमान असून हे योग्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा निघावा, असे उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…अशी शपथ सर्वांनी घ्यायला हवी – नरेंद्र मोदी

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष? लवकरच घोषणा