in

सारथीची बैठक;संभाजी राजेंना व्यासपीठाऐवजी तिसऱ्या रांगेत स्थान

Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आयोजित करण्यात आलेल्या सारथी संस्थे संदर्भातलया बैठकीत गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या बैठकीत छत्रपती संभाजी राजेंना व्यासपीठाऐवजी बैठक व्यवस्थेच्या तिसऱ्या रांगेत स्थानं देण्यात आले होते. हे बैठीकीतील मराठा समन्वयकाला पटले नसल्याने बैठकीत एकच गोंधळ उडाला होता.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित होती. या बैठकीत अजित पवार यांच्या विनंतीवरूनच संभाजी राजे उपस्थित झाले होते. यावेळी बैठकीला आलेल्या छत्रपती संभाजी राजे यांना समोर खाली खुर्च्यांवर बसलेल्या सदस्यांमध्ये तिसऱ्या रांगेत बसवण्यात आलं. त्यामुळे बैठकीला उपस्थित असलेल्या मराठा समाज समन्वयकांनी तीव्र आक्षेप नोंदवत संभाजी राजे यांना व्यासपीठावर बसावं असा आग्रह धरला. त्यांनतर समन्वयकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी अजित पवारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र ते शांत झाले नाहीत. शेवटी संभाजी राजे यांनीच समजूत काढून तिसऱ्या रांगेतच बसणं पसंत केलं. ( सारथी बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी देणार; अजित पवारांची घोषणा )

सदस्य म्हणून या बैठकीला उपस्थित झालेलो आहे. कोणत्याही मान-सन्मानासाठी मी आलेलो नाही. त्यामुळे मला सरकारला प्रश्न विचारता येतील. मी व्यासपीठावर बसलो, तर माझी भूमिका वेगळी होईल’, असं म्हणत संभाजी राजे यांनी प्रसिद्ध माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

‘महा’ रोजगार मिळवून देणारा ‘जॉब्स’

सारथी संस्थेला उद्या 8 कोटींची मदत-अजित पवार