in

उन्नाव बलात्कार आरोपीच्या पत्नीला भाजपाकडून निवडणुकीचं तिकीट

उन्नाव बलात्कारातील आरोपी कुलदीप सेनगरच्या पत्नीला भाजपनं निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. संगीता सेनगर ह्या आरोपी कुलदीपच्या पत्नी आहेत. संगीता भाजपाच्या तिकीटावर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणूक लढणार आहेत. संगीता सेनगर यांच्याकडे उन्नाव जिल्हा पंचायतीचं अध्यक्षपद होतं. संगीता सेनगर फतेहपूर चौरासी त्रितयामधून निवडणूक लढणार आहेत.

कुलदीप सेनगर हे भाजपाचे आमदार होते. बलात्कार प्रकरणात कुलदीपचे नाव आल्यानंतर पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली. यानंतर भाजपानं कुलदीप यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

उन्नाव बलात्कार पीडितेचा मुद्दा देशभर गाजला. पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणात न्यायालयानं सेनगर यांना दोषी ठरवत १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसंच १० लाखांचा दंड ठोठावला होता. यामध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचा कुलदीप सेनगरचा दावा आहे. २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कारप्रकरणी न्यायालयानं कुलदीप सेनगर यांना आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात 33 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

MPSC च्या परीक्षा पुढे ढकला; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना फोन