in

Unlock 4.0 Guidelines; सप्टेंबरपासून ‘या’ गोष्टी होणार सुरु ?

Share

देशात कोरोना माहामारीमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. मात्र आर्थिक व रोजगारासारखे प्रश्न भेडसावत असल्याने पुन्हा देश अनलॉक करावा लागला. त्यानुसार अनलॉक प्रक्रीयेद्वारे विविध विविध सार्वजनिक सेवा सुरु करण्यात आल्या. आता पुन्हा अनलॉक 4.0 प्रक्रिया राबवली जाणार आहे. या अनलॉक 4.0 मध्ये कोणकोणत्या शिथिलता देण्यात येणार आहे ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

केंद्र सरकार 1 सप्टेंबरपासून चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण मॉल्समधील चित्रपटगृह उघडण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नव्या स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची घोषणा केली.

त्याचबरोबर 1 सप्टेंबरपासून दिल्लीमध्ये मेट्रो सेवा 15 दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या काळात फक्त 50 प्रवाशांना मेट्रोच्या एका बोगीमध्ये प्रवेश करता येणार आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आलेली आहे. पण अद्याप अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील बंद असलेल्या शाळा 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यास परवानगी मिळू शकते. पण केंद्र सरकारने शाळा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारवर सोपवला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Rajguru Birth Anniversary;सशस्त्र क्रांतिकारक; शिवराम हरी राजगुरू

महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये फुट ? सुनिल केदार यांचा वरिष्ठ नेत्यांना टोला