in

गुगलकडून नारीशक्तीचा अनोखा सन्मान

स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून गुगलने अनोख्या पद्धतीचे डुडल साकारलं असून या डुडलच्या माध्यमातून गुगलने जगातील सर्व नारी शक्तीचा सन्मान केला आहे. या डुडलमध्ये व अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला दाखवल्या आहेत. विज्ञान, कला, क्रिडा, मनोरंजन, मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश असून अश्या प्रकारे गुगलने अनोख्या पध्दतीने स्त्री शक्तीला सलाम केला आहे.

महिला दिनाची सुरवात कशी झाली

जागतिक महिला दिन साजरा करण्याची सुरुवात 28 फेब्रुवारी 1909 रोजी करण्यात आली. 1910च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत एक ठराव मांडण्यात आला होता. त्या सूचनेनुसार 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो.

डूडलमध्ये काय आहे खास

जागतिक महिला दिनादिवशी गूगलने खास डूडल साकारले आहे . या डूडलमध्ये काही महिलांचे हात एकमेकांच्या हातात दिसत आहेत. त्यानंतर जगभरातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे हात एकत्रीत येताना दाखवण्यात आले आहेत. यात अनेक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला दिसत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आज जागतिक महिला दिन; ‘लोकशाही न्यूज’कडून शुभेच्छा

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी