in

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन मुंबई दौऱ्यावर

लोकशाही न्यूज नेटवर्क

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मुंबई दौऱ्यावर आहे. केंद्रीय बजेटसंदर्भात सीतारमण मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहे.

अर्थसंकल्पातील तरतुदी अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाने देशभर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमानुसार सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार परिषदा तसेच विशेष निमंत्रितांची संमेलने आयोजित करण्यात येत आहेत.

कार्यक्रमाच्या निमित्ताने दि. 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन, दि. 6 फेब्रुवारी रोजी केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठवहन मंत्री मा. नितीन गडकरी हे वर्धा येथे तसेच पुण्यामध्ये केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री मा. प्रकाश जावडेकर, केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते मा.देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते मा.प्रविण दरेकर, माजी मंत्री मा.सुधीर मुनगंटीवार, तसेच अन्य पदाधिकारी हे पत्रकार परिषदा तसेच विशेष संमेलने घेतील अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिवसेनेचं मुंबई मा जलेबी ने फाफडा’नंतर आता ‘रासगरबा’

इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक