in

‘उद्योग बंद, बेरोजगारीत भर; तरीही मोदीजी गप्प का?’

Share

कोरोनाच्या महामारीमुळे व लॉकडाउनचा अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. त्यात लघु उद्योग समस्यांच्या कात्रीत अडकले असून, देशातील १.७५ कोटी लघू उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हे उद्योग बंद झाल्यास बेरोजगारीत आणखी भर पडणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, या मुद्यावरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

देशातील लघु उद्योग संकटात असल्याचं सांगत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं १.७५ कोटी लघु श्रेणीतील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा दिला आहे. या अहवालातील आकडेवारीवरून काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर सवाल केला आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी काही मुद्दे उपस्थित करत मोदीजी गप्प का आहेत?, असा सवाल केला आहे. “आधी १२ कोटी नोकऱ्या गेल्या. १.७५ कोटी लघु उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यातील अर्धे उद्योग जरी बंद झाले, तरी २० कोटीहून अधिक लोकांची रोजीरोटी जाईल. मोदीजी गप्प का आहेत? माध्यमातील सहकाऱ्यांनीही अभिनेत्रीतून वेळ मिळाला की, मोदी सरकारला देशाविषयी प्रश्न विचारवेत,” असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

भारतीय सैन्यांनी चीनला शिकवला धडा – राजनाथ सिंह

बनावट कागदपत्रांच्या आधारे मोटारसायकल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश