in

‘…मोती स्नानाची वेळ झाली’ जाहिरातीतील अलार्म काकांचे निधन

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचे निधन झाले आहे. विद्याधर करमरकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यासोबत अनेक जाहिरातीतही ते झळकले होते. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. दिवाळीच्या काळात येणाऱ्या मोती साबण्याच्या जाहिरातीमध्ये‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’या जाहिरातीतील ‘अलार्म काका’ म्हणून ते फार प्रसिद्ध होते.

विद्याधर करमरकर यांनी आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’ , ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे. अनेक हिंदी चित्रपटात ते वडील किंवा आजोबांच्या भूमिकेत पाहायला मिळायचे.

दरवर्षी दिवाळीदरम्यान टीव्हीवर प्रसिद्ध होणारी ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ ही मोती साबणाच्या जाहिरातीत ते झळकले होते. त्यात त्यांनी ‘अलार्म काकां’ची भूमिका साकारली होती. यासोबतच इंडियन ऑइल, पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, लिनोवो कंप्युटर्स, एशियन पेंट यासारख्या जाहिरातीत त्यांनी काम केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नोव्हेंबरपासून अमेरिकेच्या प्रवासासाठी नवे नियम जाहीर

रशियातील निवडणूकीत पुतीन यांचा निर्विवाद विजय !