in ,

‘UN HUMAN RIGHTS’ची शेतकरी आंदोलनात उडी; टि्वट करून दिला सल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क

अमेरिकन पॉपस्टार रियाना आणि पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांच्या टि्वटनंतर शेतकरी आंदोलनााचा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा ठरला. रियाना आणि ग्रेटाच्या टि्वटनंतर भारतातील क्रिकेट आणि सिनेक्षेत्रातील अनेकांनी टि्वट करून केंद्र सरकारची भूमिका घेतली. आता या प्रकरणात यूएन ह्युमन राईट्सनंही उडी घेतली आहे.

‘आम्ही भारतातील अधिकारी आणि आंदोलकांना सांगू इच्छितो की, शेतकरी आंदोलनादरम्यान जास्तीत जास्त संयम पाळावा. अभिव्यक्ती अधिकार शांततापूर्ण मार्गानं ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीनं सुरक्षित राखले जावेत. या मुद्यावर योग्य तोडगा काढणं सर्वांसाठी महत्त्वाचं झालं आहे’, असा सल्ला युनायटेड नेशन ह्युमन राईट्सनं दिला आहे.

रियाना, ग्रेटा आणि मिया खलिफा यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ टि्वट केल्यानंतर याविषयाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं भूमिका मांडत उत्तरही दिलं आहे.

गाझीपूर, टिकरी आणि सिंघू सीमेवर शेतकरी गेल्या २ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी ठाम आहेत. या तिन्ही ठिकाणांवरील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्याचबरोबर रस्तेही ब्लॉक करण्यात आले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जामीन मंजूर

महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट, हवामान विभागाने दिला नवा इशारा