in

उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला, 5 जणांना काढलं बाहेर

मयुरेश जाधव | उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. कॅम्प 2 मधील साई शक्ती या चार मजली इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला, चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळत थेट तळमजल्यावर आला, आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 5 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या इमारतीत एकूण 29 फ्लॅट्स आहेत. दुर्घटनेचं वृत्त समजताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठाणे महापालिकेची टीडीआरएफ टीम घटनास्थळी रवाना झालीय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी, कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरला

उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला;7 जणांचा मृत्यू