in

UGC NET 2021 Postpone | NET २०२१ ची परीक्षा लांबणीवर टाकण्याची विद्यार्थ्यांची मागणी

राज्यात कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 2 लाख 61 हजार 500 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या गेल्या आहेत. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून घेतली जाणारी नीट पीजी परीक्षा देखील लांबणीवर टाकली गेली आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता आता राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा देखील लांबणीवर टाकावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. (UGC NET 2021 exam postpone Maharashtra Students demand)

नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षाही इतर परीक्षांप्रमाणे पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 2 मे ते17 मे दरम्यान नेटची परीक्षा होणार आहे. दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्स मार्फत सहायक प्राध्यापक पदासाठी परीक्षा घेतली जाते.

नियोजित वेळापत्रकाप्रमाणं मे महिन्यात परीक्षा

UGC NET 2021 परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणं मे महिन्यातील 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 तारखेला आयोजित केली जाणार आहे. तसेच डिसेंबर 2020 महिन्यातील यूजीसी नेटची परीक्षा कोरोनामुळे लांबली होती. ती आता 2021 च्या मे महिन्यात घेतली जाईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर, मी ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते’

IPL 2021 | दिल्लीसमोर आज पंजाबचे आव्हान