in

‘मराठा समाजाला आरक्षण द्या, अथवा आम्हास विष पिऊन मरु द्या’ – उदयनराजें भोसले

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्ला चढवला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, अथवा आम्हास विष पिऊन मरु द्या, असे कॅप्शन असणारी फेसबुक पोस्ट उदयनराजेंनी लिहिली आहे. या पोस्टमध्ये आरक्षण या विषयावर एककलमी कार्यक्रम हाती घ्या. तातडीने मराठा आरक्षणाचा निकाल लावा. अन्यथा खुर्च्या खाली करा, असा इशाराच उदयनराजे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

‘महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाचा फक्त मतांसाठी वापर करणाऱ्यांनी शेकडो वर्षे समाजाच्या प्रश्नांना झुलवत ठेवलं आहे. मराठा समाजातील तरुणांना गृहित धरुन शेकडो वर्षे सत्तेच्या पदांवर बसणाऱ्यांनी आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत ठेवला. सध्या होत असणाऱ्या बैठकांमध्ये मला फारसे गांभीर्य दिसत नाही आहे.

काय आहे पोस्ट मध्ये ?
‘मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात का? मराठा समाजातील लाखो तरुन निराशेच्या गर्तेत आहेत. आरक्षणाचा प्रश्न आता सुटला नाही तर तो कधीच सुटू शकत नाही, याची जाणीव मराठा समाजातील तरुणांना झाली आहे. सरकारने गांभीर्याने घेतलं नाही तर मराठा समाजातील तरुण वेगळे पाऊल उचलू शकतात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या अन्यथा विष पिऊन मरु द्या’.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आमदार निधीत १ कोटीची वाढ

सचिन वाझेंच्या वकिलीसाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांचा टोला