कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधला. या वेळी आतापर्यंत महाराष्ट्रात 9 लाख कोरोना योद्ध्यांना लस दिली गेली आहे. पण ज्या 9 लाख लोकांना लस दिली त्यांच्यात घातक असे साईड इफेक्ट नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री दिली.
कोरोनाविरोधातील लढाईत महाराष्ट्र पुढे आहे.बेधाकपणे लसीकरण करून घ्या असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. कोरोनाशी लढताना मास्क हीच आपली ढाल आहे. राज्यात ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या महिमेनंतर आता ‘मी जबाबदार’ ही मोहीम सुरू.
सुजाणपणे सूचनांचं पालन करा. सगळ्यांना वाटलं कोरोना गेला. कोरोनाची लाट खाली जाते, वर येते. पण खाली जाते त्याच वेळेस तिला थांबवायचं असतं. पाश्चिमात्य देशात लॉकडाऊन गेल्या एक दीड महिन्यापासून आहेत. ब्रिटनमध्ये तर वर्षभरापासून लॉकडाऊन. संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय आहे. आठ दिवसांचा आढावा घेऊन, योग्य तो निर्णय घेऊ असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाचे नियम
- शासकीय कार्यक्रम समारंभावर बंदी
- उद्यापासून धार्मिकस्थळे पुन्हा बंद
- राज्यात काही दिवस सर्व प्रकारच्या मिरवणुका, मोर्चे, आंदोलन यांना बंदी
- ऑफिसच्या वेळांची विभागणी करा, ‘वर्क फ्रॉम होम’ वर जास्त भर द्या
Comments
Loading…