महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. रविवारी सात हजाराच्या आसपास नव्या रुग्णांची संख्या गेली होती. याबाबत निती आयोगाने विशेष माहिती दिली. महाराष्ट्रात दोन प्रकारचे विषाणू आढळले असल्याचे निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.
निती आयोगाने आज (23 फेब्रुवारी) देशातील कोरोनाच्या स्थितीबद्दलची माहिती दिली. महाराष्ट्रासह केरळ आणि तेलंगणा या राज्यांमध्ये कोरोनाचे दोन विषाणू (व्हेरिएन्ट) आढळले आहेत. एन440के आणि ई484के असे हे दोन प्रकार आहेत. तथापि, महाराष्ट्र आणि केरळच्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा जो उद्रेक झाला आहे, तो या दोन प्रकारांमुळे झाला आहे, असे म्हणता येणार नाही. कारण त्याला वैज्ञानिक आधार नाही, असे डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले.
देशभरात आतापर्यंत यूके स्ट्रेनचे 187 रुग्ण आढळले आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेच्या स्ट्रेनचे सहा आणि ब्राझिल स्ट्रेनचा एक रुग्ण सापडला आहे, असेही पॉल म्हणाले.
Comments
Loading…