in ,

शिवसेनेच्या ‘या’ दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू

Share

राज्याच्या सत्तेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्याच नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातली हि घटना आहे. शिवसेनेच्या दोन नगरसेवकांना कोरोनाची लागन झाली होती. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची आता घटना घडली आहे. यामुळे स्थानिक शिवसैनिक व कार्यकर्त्यामध्ये शोककळा पसरली आहे.

औरंगाबादमधले शिवसेनेचे नगरसेवक नितीन साळवी व नगरसेवक रावसाहेब आमले यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान या दोन्ही नगरसेवकाचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेने औरंगाबाद शहरातील शिवसैनिकांमध्ये शोक व्यक्त होत आहे.

दरम्यान औरंगबादमध्ये गेल्या 12 तासांमध्ये तब्बल 166 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 7 हजार 300 वर गेला आहे.आतापर्यंत जिल्ह्यात 327 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या 3 हजार 149 रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण 3 हजार 824 रुग्णांची कोरोनावर मात केली.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

अमेरिकेत कोरोनाचा कहरच; 24 तासात आढळले रेकॉर्ड ब्रेक रुग्ण

आरोग्यासाठी लवंग खाण्याचे फायदे जाणून घ्या!