in

आजीच्या दशक्रीयेसाठी नदीवर अंघोळीला गेलेले दोघे बुडाले

आजीच्या दशक्रिया विधीसाठी नदीवर गेलेल्या दोन नातवांचा अंघोळ करतेवेळी बुडून मृत्यू झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर गवळी या गावामध्ये संबंधित घटना घडली आहे. मनीष टोपमे (वय-23वर्षे) व ईश्वर टोपमे (वय- 25वर्षे) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन तरुणांचे नाव आहे.

या दोन्ही तरुणांच्या आजीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आज दशक्रियाचा कार्यक्रम गावातील एका नदीकाठीच्या मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी नातू मनीष व ईश्वर टोम्पे हे दोघेही नदीत आंघोळीला गेले. दरम्यान नदीला जास्त पाणी असल्याने हे दोघे भाऊ नदीतील भोवऱ्यात अडकले. यात त्यांचा मृत्यू झाला.

यावेळी नातेवाईकांनी नदीत उतरून या दोघांनाही जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने या दोघांचेही निधन झाले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Eknath Shinde |”महाडसाठी नगररचना विभागाच्या नियमांमध्ये बदल करणार”

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प | १ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन