in

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर अपघात; दोघे जागीच ठार

Share

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या खोपोलीजवळ बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरआज सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत दोघे जागीच ठार झाले आहेत. या अपघाताने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

खोपोलीजवळ बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मुंबईकडे येणाऱ्या कंटेनरने कारला भीषण धडक दिली. या धडकेनंतरही त्यापाठोपाठ आणखी दोन वाहनं येऊन धडकली. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत. हे दोघे जण कोण होते याची ओळख अद्याप पटली नाही आहे.

दरम्यान या घटनेने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.त्यामुळे पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

अभिनेते सयाजी शिंदे यांचं अनोखं आवाहन; वारीनिमित्त झाडाला द्या आलिंगन

लोकल प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी;केली ‘ही’ घोषणा…