in

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने दोन बनावट फेसबुक पेज

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने दोन बनावट फेसबुक पेज तयार करून पैसे मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा बनावट फेसबुक पेजच्या अकाऊंट वरून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका आणि त्याने पैसे मागितल्यास तात्काळ ते अकाऊंट ब्लॉक करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.

Collectorate ratnagiri या नावाने दोन बनावट फेसबुक अकाऊंट सुरू करण्यात आली आहेत. या अकाऊंटवरून नागरिकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैसे मागितल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

ही गोष्ट लक्षात येताच जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांनी अधिकृत फेसबुक पेजवरून नागरिकांना आपल्या नावाने दोन बनावट फेसबुक अकाऊंट सुरू असून त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. पैसे मागितल्यास त्यांना प्रतिसाद न देता पोलीस ठाण्यात त्यांची तक्रार करा, असे आवाहन केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…आणि युवराज सिंगने एकाच षटकात लगावले सहा षटकार!

मिरा भाईंदर गणपती बाप्पा च दर्शन घेताना