in

इंदौर- दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले; पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात झाला असून इंदौर पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले. लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ सकाळी पावणे आठ वाजता घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबईहून पुण्याला येणाऱ्या इंदौर एक्सप्रेसचे दोन डबे लोणावळा रेल्वे स्थानकात रुळावरुन घसरल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ही घटना घडली आहे. दरम्यान, सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. इंदौर एक्सप्रेस सकाळी सात वाजून ५७ वाजता मिनिटांनी लोणावळा रेल्वे स्थानकात दाखल होत होती. त्यावेळी मागचे दोन डबे (जनरल) रुळावरून घसरले.

एक्स्प्रेसचे दोन डबे रूळावरुन घसरल्यानंतर डबे पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत आहेत. या घटनेमुळं मुंबईहून- पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात गुलाब चक्रीवादळामुळे आज, उद्या अतितीव्र पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स