in

कंगनाला ट्विटचा दणका, आक्षेपार्ह ट्विट केले डिलीट

लोकशाही न्यूज नेटवर्क

वादग्रस्त ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री कंगना रणौत हिला ट्विटने चांगलाच दणका दिला आहे. नुकतेच कंगनाने आक्षेपार्ह ट्विट केले होते. शेतकरी आंदोलनचा मुद्दा जास्तच तापत चालला आहे. या प्रकरणात शेतकरी आंदोलनाच्या बाजूने कला क्षेत्रातील कोणीही ट्विट केले तर कंगना त्यांना कठोर शब्दात प्रतिउत्तर देते. कंगनाने ट्विटमध्ये वापरला गेलेल्या ओळी ट्विटरच्या नियमांचे भंग करत आहे, म्हणून हे ट्विट तिच्या ट्विटरवरून काढून टाकण्यात येत आहे. असे स्पष्टीकरण ट्विटरकडून देण्यात आले आहे.

नुकतेच अमेरिकेने नव्या कृषी कायदयांचे समर्थन दिले या संदर्भात कंगना रणौत यांनी आपल्या ट्विटमध्ये अमेरिकेच्या कृषी कायद्यांना पाठिंबा दर्शविल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. “ऐका लिब्रो, तुझे वडील गजनी तुला वाचवण्यासाठी आले नाहीत. तो पळून गेला…” अशा शब्दात तिने ट्विट केले.

त्याचं प्रमाणे अभिनेता दिलजीत दोसांझ बरोबरच तिचा वाद चांगला गाजला. दिलजीतला तिने खलिस्तानी म्हटले. शेतकऱ्यांबद्दलही तिने प्रक्षोभक टिप्पणी केली. त्यामुळे अनेक युझर्सनी टि्वटरकडे कंगनाच्या अकाऊंटची तक्रार केली व तिच्या टि्वटर अकाऊंटवर बंदी घालण्याची मागणी केली.

रोहित शर्माला काय म्हणाली कंगना :
शेतकरी देशाचा खूप महत्वाचा भाग आहेत. भारत प्रश्न सोडवण्यामध्ये नेहमीच सक्षम राहिला आहे. हा प्रश्न देखील लवकरच सोडवला जाईल असा विश्वास आहे. अशा आशयाचे ट्विट रोहित शर्मा यांनी केले होते त्याला उत्तर देताना ”हे सर्व क्रिकेटर त्यांची अवस्था धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, अशी झाल्यासारखे का बोलत आहेत. देशात क्रांती घडवणाऱ्या कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध का, हे ते का विचारत नाहीत. हे सर्व दहशतवादी आहेत… हे एवढ बोलायला घाबरताय कशाला?,”असं ट्विट कंगनाने केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

India vs England | भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये शुक्रवारपासून कसोटी मालिकेला सुरुवात

ही तर टाइमपास टोळी; विधानसभा निवडणुकीत साथ देणाऱ्या मनसेवर आदित्य ठाकरेंची टीका