in

ट्विटर नरमलं… डिजिटल नियमांचं पालन करण्याचं आश्वासन!

केंद्र सरकार आणि ट्विटरमधील वाद अखेर शमल्याचं चित्र आहे. डिजिटल नियम २०२१ चे पालन करण्यासंबंधी सोशल मीडिया कंपनी ट्विटर आता नरम होताना दिसत आहे. डिजिटल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलली जात आहेत, असे ट्विटरने सरकारला सांगितले. तसेच याबाबत एका आठवड्यात नवीन डिजिटल नियमांचे पालन करण्याबाबत झालेल्या प्रगतीचा तपशील सरकारला सादर करू, असे ट्विटरने स्पष्ट केले.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक हटवल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला डिजिटल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अल्टिमेटम दिला होता, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

फेसबूक, गुगल यांसह अनेक कंपन्यांनी डिजिटल नियमांनुसार तक्रार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासारखी अनेक पावले उचलली आहेत. परंतु ट्विटर आणि सरकारमधील संघर्ष कमी होताना दिसत नव्हता. अखेर ट्विटरने नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे दिसते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ठाण्यात अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर गुरुवारपासून लसीकरण बंद

जितिन प्रसाद यांचा भाजप प्रवेश; महाराष्ट्रात पडसाद