in ,

पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी टीव्ही अभिनेता करण मेहराला अटक

टीव्ही अभिनेता करण मेहराला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. माहितीनुसार पत्नीसोबत भांडण आणि मारहाण केल्याने गोरेगाव पोलिसांनी काल रात्री करणवर कारवाई केली आहे. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

निशा ही देखील अभिनेत्री असून तिने काही हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. गोरगांव पोलिसांत निशाने तक्रार दिली होती.

निशा आणि करण यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खटके उडत आहे. त्यांच्या वैवाहीक आयुष्यात वादळे आली असून त्याची बरीच चर्चा हिंदी मालिकासृष्टीत सुरू होती. करणने आपल्याला मारहाण केल्याचं निशाने तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून करणला अटक केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाच्या स्ट्रेनचं WHOकडून नामकरण; भारतातील स्ट्रेन ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’

शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुखावर खंडणीचा गुन्हा दाखल